Sakshi Sunil Jadhav
श्रावण शुक्ल पौर्णिमा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०७ वाजता सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४९ वाजता समाप्त होईल.
हिंदू धर्मपरंपरेनुसार उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने रक्षाबंधन २८ ऑगस्टला साजरे करण्याची मान्यता आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या संरक्षणाच्या वचनाचे प्रतीक मानला जातो.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.
भविष्य पुराणातील कथेनुसार, इंद्राणीने पवित्र रक्षासूत्र बांधल्यानंतर इंद्राला देव-दानवांच्या युद्धात विजय मिळाल्याचे सांगितलं जातं.
लोकप्रिय महाभारत कथेनुसार, द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमेवर आपल्या साडीचा तुकडा बांधला आणि पुढे श्रीकृष्णांनी तिचे रक्षण केले.
रक्षाबंधन फक्त भाऊ-बहिणीपुरते मर्यादित नसून प्रेम, विश्वास, कर्तव्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
रक्षाबंधनाशी संबंधित कथा आणि परंपरा या धार्मिक मान्यतांवर आधारित असून, त्यांचा उद्देश सणाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगणे हा आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.