अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना
६० वर्षीय आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
चार ते पाच दिवसांपासून अत्याचार झाल्याचा आरोप
तक्रारीनंतर पोलिसांची तातडीने कारवाई
अक्षय गवळी, अकोला
सध्या राज्यात नसरापूरच्या घटनेवरून समाजमन संतप्त आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय.
मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केलाय. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती.
मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर तो फरार झालाय. अकोला पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झालीयेत..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.