Palghar Crime Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime : बँकेने ताब्यात घेतलेल्या कंपनीतून चोरी; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Palghar News : बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना आल्याने बोईसर तारापूर एमआयडीसीतील शेकडो कारखाने बँकांनी सील केले आहेत.

रुपेश पाटील

पालघर : कर्जाची परतफेड करता न आल्याने बँकांनी काही कंपन्या ताब्यात घेतल्या होत्या. ताब्यात घेतलेल्या (Palghar) बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून दिवसाढवळ्या सर्रासपणे भंगार माफियांकडून कंपन्यांमधून भंगार चोरी (Theft) केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा बोईसरमध्ये उघडकीस आला आहे. यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

बँकेकडून (Bank) घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना आल्याने बोईसर तारापूर एमआयडीसीतील शेकडो कारखाने बँकांनी सील केले आहेत. मात्र अशा कारखान्यांमधून सर्रासपणे या कारखान्यातील सामग्री चोरी (Crime News) केलं जात असल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. कारखानदार आणि बँकांसोबत हात मिळवणी करून ही चोरी केली जात असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरी करताना ट्रक चालक ताब्यात 
बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए (४/५) वर असलेल्या मेमर्स पायोनियर बॉल या बँकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्यातून लाखो रुपयांचं भंगार चोरी केली जात होती. चोरी करत असताना एका ट्रकसह चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. कर्ज देणाऱ्या बँकांना भंगार माफीयांकडून गंडा घातला जात असून बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रक आणि ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून बोईसर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT