Unseasonal Rain : साताऱ्यात बळीराजा संकटात, गारांच्या पावसाने जावळीला झोडपलं, गहू, ज्वारी पाण्यात

Satara Weather News : साताऱ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जावळी तालुक्यात गहू आणि ज्वारीची काढणीसाठी तयार पिके पाण्यात गेली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.

Satara unseasonal Rain Update News : कडाक्याच्या उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात आला आहे. साताऱ्यात शनिवारी रात्री आणि सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारांच्या पावसाने काढणीला आलेले ज्वारी आणि गव्हाचे पिक पाण्यात गेलं अन् शेतकरी राजा कोलमडला. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. (hailstorm destroys wheat and jowar in Javli taluka)

सातारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय आहे. जावळी तालुक्यात गारांचा पाऊस झालाय. रानगेघर, करंदी आणि मेढा परिसरात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. शेतात काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकाला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com