Hingoli News : शेतकऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालय काढले विक्रीला; हिंगोलीत कर्ज फेडण्यासाठी आंदोलन

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये तहसील कार्यालयात दाखल होत शेतकऱ्यांनी शासनाचे कार्यालय पोस्टर लाऊन विक्री करण्याची घोषणा केली आहे.
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीत दुष्काळामुळे नापिकी झाली आहे. यामुळे कर्जफेडीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यासाठी (Hingoli) आंदोलन उभारत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) शासनाच्या मालकीचे अप्पर तहसील कार्यालय विक्रीला काढले आहे. (Live Marathi News)

Hingoli News
Fraud Case : ऊसतोड मजुर पुरविण्याचे सांगत ११ लाखांत फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मागील तीन वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सतत पडत असलेला दुष्काळ आणि त्यातून शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँक आणि खाजगी सावकाराचा बोजा वाढला आहे. उत्पन्न येत नाही, शिवाय जे उत्पन्न आले त्या मालाला भाव मिळत नसल्याने (Debt) कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या मुळेच आपण हे शासनाचे कार्यालय विक्रीला काढले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News
Nandurbar Corona Update: नंदुरबारमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; उपचारासाठी पाठविले सुरत 

तहसील कार्यालयांसोबत शेतजमीनही विक्रीला 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये तहसील कार्यालयात दाखल होत शेतकऱ्यांनी शासनाचे कार्यालय पोस्टर लाऊन विक्री करण्याची घोषणा केली आहे. धक्कादायक म्हणजे या शेतकऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालय सोबत स्वतःची शेत जमीन, गोठे आणि जनावरे देखील विक्रीला काढली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com