Beed Fraud Case
Beed Fraud CaseSaam tv

Fraud Case : ऊसतोड मजुर पुरविण्याचे सांगत ११ लाखांत फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed News : उसतोडणीचे काम सुरु असून यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. ठेकेदारी पद्धतीने मजुरांचा पुरवठा केला जात असतो.
Published on

बीड : ऊस तोडणीसाठी मजुर पुरवितो म्हणून गाडी चालकांकडून ११ लाख घेतले. मात्र मजुरांचा पुरवठा केला नाही. त्यामुळे फसवणूक केल्या प्रकरणी (Beed) बीड शहरातील सात जणाविरोधात पेठ बीड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Beed Fraud Case
Chinese Manja : अकोल्यात चायना मांज्याने दोन जण जखमी; गळा कापला गेल्याने पडले सहा टाके

उसतोडणीचे (Sugarcane) काम सुरु असून यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. ठेकेदारी पद्धतीने मजुरांचा पुरवठा केला जात असतो. अशाच प्रकारे ऊस तोडणीच्या कामासाठी अशोक बाळाभाऊ शेंडगे या गाडी चालकाला मजुर देतो. म्हणुन आरोपी किशन पवार व इतरांनी मजुर पुरविण्यासाठी शेंडगे यांच्याकडून ११ लाख ६६ हजार रूपये घेतले. मात्र पैसे घेवूनही (Fraud) त्यांना मजुर पुरविण्यात आले नाही. मजूर देण्याबाबत वारंवार संपर्क साधला. मात्र समोरच्याने मजूर पाठविलेच नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Fraud Case
MSRTC Electric Bus : ग्रामीण भागातही महामंडळाची ई-बस; महामंडळाकडून काढण्यात आली निविदा

मजूर पाठविले नाही म्हणून शेंडगे यांनी किशन पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी शिवीगाळ करून धमकावण्यात आले. दरम्यान या प्रकरणी सात आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com