MSRTC Electric Bus : ग्रामीण भागातही महामंडळाची ई-बस; महामंडळाकडून काढण्यात आली निविदा

Sambhajinagar News : राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यात ई- बस सुरु करण्यात येत आहे. प्रामुख्याने शहर बस सेवेवर महामंडळाचे प्राधान्य आहे. यादृष्टीने चार्जिंग पॉईंट देखील उभारणीचे काम सुरु
MSRTC Electric Bus
MSRTC Electric BusSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाकडून सध्या छत्रपती संभाजीनगर- पुणे मार्गावर ई -बस (electric Bus) सेवा सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे शहरा पाठोपाठ आता ही सेवा ग्रामीण भागातही देण्यात (Sambhajinagar) येणार असून लवकरच ग्रामीण भागातील रस्त्यावर ई- बस धावणार आहे. (Tajya Batmya)

MSRTC Electric Bus
Jal Jeevan Mission Yojana : जलजीवन मिशनच्या कामासाठी टक्केवारी वाढली; शिंदे गटाचे संपर्क प्रमुख रघुवंशी यांचा सरकारवरच आरोप

राज्य परिवहन महामंडळाकडून (MSRTC(MSRTC) राज्यात ई- बस सुरु करण्यात येत आहे. प्रामुख्याने शहर बस सेवेवर महामंडळाचे प्राधान्य आहे. यादृष्टीने चार्जिंग पॉईंट देखील उभारणीचे काम सुरु आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात ई- बस सुरु असून ग्रामी भागातही ही बस सेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. त्यादृष्टीने चार्जिंग स्टेशन उभा करण्याची निविदा महामंडळाकडून काढण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MSRTC Electric Bus
Chinese Manja : अकोल्यात चायना मांज्याने दोन जण जखमी; गळा कापला गेल्याने पडले सहा टाके

एसटी महामंडळाकडून (MSRTC Bus) आगामी काळात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ५ इलेक्ट्रिक बस पुणे मार्गावर धावत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरसाठी ७८ इलेक्ट्रिक बस प्रस्तावित असून त्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com