अभिजित देशमुख
कल्याण : पत्नीसह सात वर्षाच्या मुलाची हत्या करणारा दिपक गायकवाडचे फसवणुकीचे कारनामे देखील (Kalyan) उघड झाले आहेत. जादा मोबदल्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७०० जणांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात (Crime News) तक्रार दिली आहे. आतापर्यत ३९ कोटींची फसवणूक समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Live Marathi News)
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणारा दीपक याने त्यांची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. या प्रकरणी महात्मा फुले पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून दिपकची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. (Kalyan Crime News) दिपक गायकवाड याचे आणखी कारनामे उघडकीस आले आहेत. दीपक याची निधी रिसर्च फर्म नावाची कंपनी होती. या कंपनीत गुंतवणूक (Fraud Case) करणाऱ्या नागरीकांना जास्त परतवा देण्याचे आमिष दाखवित होता. आमिषाला अनेक लोक बळी पडले. दोन दिवसापूर्वी कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांना शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आणि मयत महिलेचे नातेवाईक आणि फसवणूक झालेल्या नागरीकांनी भेट घेतली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भेटी दरम्यान साडेतीन हजार लोकांचे जवळपास ४०० कोटी रुपये बुडविले असल्याची माहिती नागरीकांनी दिली होती. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांनी आत्तापर्यंत ७०० जणांच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगितले. दीपकने या नागरीकांकडून ३९ कोटी रुपये उकळले आहेत. या प्रकरणी महात्मा फूले पोलीसांनी नोंद करत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.