Ayodhya Ram Mandir : कल्याण पूर्वेत उभारणार श्रीराम मंदिराची प्रतिकृती; भाविकांना अनुभवता येणार सोहळा

Kalyan News : आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: येत्या २२ तारखेला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होत असून यानंतर मंदिर भाविकांसाठी (Kalyan) खुले केले जाणार आहे. त्यामुळे देशभरात राम भक्तांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराचे प्रतिकृती उभारण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. (Latest Marathi News)  

Ayodhya Ram Mandir
Mumbai Corona Update : मुंबईकरांची चिंता वाढली, मुंबईत वर्षभरात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद

अयोध्येमध्ये येत्या २२ तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही. त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा; यासाठी कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती (Ram Mandir) उभारण्यात येत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. येथे २२ जानेवारीला भाविकांना दर्शन देखील घेता येणार आहे. आज खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Ram Mandir
Bhandara Fire News: उंदरानं दिव्याची वात पळवली अन् घरात आग लागली; मौल्यवान साहित्य जळून खाक

पाच दिवसात पूर्ण होणार काम 

येत्या पाच दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जवळपास पंधरा दिवस या ठिकाणी अध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. यामुळे परिसरातील भाविकांना अयोध्येतील सोहळा अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com