Palghar  Saam Tv
महाराष्ट्र

Palghar: तारापूर MIDC मधील कंपनीत वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू; चौघांची प्रकृती चिंताजनक

Boisar MIDC: बोईसर एमआयडीसीमध्ये एका कंपनीत वायू गळती होऊन ४ कामगारांचा मृत्यू झाला. तर ४ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

Priya More

Summary -

  • बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये औषध कंपनीत वायूगळती.

  • ४ कामगारांचा मृत्यू, ४ जखमींची प्रकृती गंभीर.

  • मृतांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती, कमलेश यादव यांचा समावेश.

  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटनांची मालिका कायम.

रूपेश पाटील, पालघर

पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये भयंकर घटना घडली. याठिकाणी एका कारखान्यात वायू गळती होऊन ४ कामागारांचा मृत्यू झाला तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनीत ही वायुगळती झाली. जखमी कामगारांवर बोईसर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ वर असलेल्या मेडली फार्मासिटिकल या कंपनीत दुपारी ३ वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना समोर आली. नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये वायु गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला झाला. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत . या जखमी कामगारांवर सध्या बोईसर मधील शिंदे या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

एल बेंडोझोल नामक औषधाचं उत्पादन घेणाऱ्या या कारखान्यात ३ वाजताच्या सुमारास वायू गळती झाली असून या वायुगळतीची बाधा कंपनीतील ८ कामगारांना झाली. या आठही कामगारांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच ४ कामगारांचा मृत्यू झाला. तर चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कल्पेश राऊत , बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर रोहन शिंदे, निलेश हाडळ यांच्यासह आणखी दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी वायू गळती, कारखान्यांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना असे प्रकार वारंवार सुरूच आहेत.

दुर्दैवाने बोईसर- तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांकडून वेळेत फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट तसंच कामगारांची योग्य काळजी घेतली जात नसल्याने अशा दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा लागतोय . मात्र संबंधित प्रशासन अशा गंभीर दुर्घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याने या एमआयडीसीत दुर्घटनांची मालिका काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे या एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT