पालघर : वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असते. यामुळे बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिकेला देखील मार्ग निघणे कठीण असते. अशात रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका देखील अडकली होती. यातच महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर येथे घडली आहे.
ठाणे- घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे मुंबई- आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार वसई ते घोडबंदरपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
झाडाची फांदी कोसळल्याने जखमी
छाया पुरव ह्या मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे राहत होत्या. मात्र त्या सुट्टीनिमित्त त्यांच्या मूळ गावी सफाळे मधुकर नगर येथे आल्या होत्या. मात्र जिल्हा परिषद शाळा आणि घराच्या शेजारी झाडाच्या फांद्या कापण्याचं काम सुरू असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सुरुवातीला पालघर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात नेत होते.
ट्रॅफिकमुळे रुग्णालयात पोहचण्यासाठी उशीर
मुंबई- अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जायला खूप उशीर होत होता. परिणामी छाया गुरव यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना मिरा रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळे छाया पुरव यांचा मृत्यू रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.