Palghar Schoking News : मरणानंतरही यातना संपेना! भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, पालघरमधील भयान वास्तव

Palghar News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जांभूळपाडा या आदिवासी वस्तीमध्ये स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. दोन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित असून शासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही आदिवासींचा संघर्ष संपत नाही.
Palghar Schoking News
Palghar Schoking NewsSaam Tv
Published On
Summary
  • पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही.

  • भरपावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागल्याने हाल व वेदना वाढल्या.

  • दोन वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रस्ताव प्रलंबित असून प्रशासन उदासीन आहे.

  • आदिवासी नागरिकांनी निधी गैरवापरावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना जगण्यासाठी दिवसेंदिवस कठोर संघर्ष करावा लागत असतानाच मृत्यूनंतरही त्यांचे हाल संपत नाहीत, हे भयावह वास्तव समोर आले आहे. अजूनही अनेक आदिवासी गावपाड्यांमध्ये अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी उघड्यावर जागा शोधावी लागते, हे शासन व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.

मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा या आदिवासी वस्तीतील रहिवासी स्मशानभूमीअभावी आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. या गावात स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायतीने दोन स्मशानभूमींच्या प्रस्तावांसाठी पुढाकार घेतला आहे. सरपंचांनी स्वतः मेहनत घेऊन हे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावांना दोन वर्षे उलटूनही मंजुरी मिळालेली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे उन्हाळा असो किंवा पावसाळा अंत्यसंस्कारासाठी आदिवासी बांधवांना उघड्यावरच शवविधी पार पाडावा लागत आहे.

Palghar Schoking News
Palghar Bus Accident: बोईसर आगारात बसचा भीषण अपघात; भरधाव बस संरक्षण भिंतीला धडकली

अशाच एका घटनेत, जांभूळपाड्यातील यमुना फुपाने या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर भरपावसात तिचे अंत्यसंस्कार उघड्यावर करावे लागले. मुसळधार पावसामुळे शेवटचा निरोप देण्यासाठी अडथळे निर्माण झाले. ताडपत्री लावूनदेखील पुरेसा आडोसा न झाल्याने अंत्यसंस्कार करण्यात अडचणी आल्या. काही तासांच्या अथक परिश्रमानंतरच अंत्यसंस्कार शक्य झाले. ही केवळ एक घटना नसून, संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारच्या असुविधा कायम आहेत.

Palghar Schoking News
Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा,महाविद्यालयांना सुट्टी

शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासी विकासासाठी वितरित केला जातो. मात्र, या निधीचा लाभ खऱ्या गरजूंना पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदारांकडून निधीचा गैरवापर होत असल्याचे स्थानिक आदिवासी नागरिक सांगतात. यामुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Palghar Schoking News
Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

या पार्श्वभूमीवर, आदिवासी समाज बांधकाम विभागाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहे. मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागणं ही लोकशाहीतील दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. शासनाने तत्काळ दखल घेऊन या प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी कळकळीची अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Q

पालघरच्या कोणत्या भागात ही घटना घडली आहे?

A

ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जांभूळपाडा या आदिवासी वस्तीमध्ये घडली आहे.

Q

स्मशानभूमी प्रस्तावासाठी काय प्रयत्न झाले आहेत?

A

कुर्लोद ग्रामपंचायतीने दोन स्मशानभूमीचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठवले आहेत, परंतु दोन वर्षांनंतरही मंजुरी मिळालेली नाही.

Q

यामध्ये कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

A

मुसळधार पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागतो, ताडपत्री लावूनही शवविधी करणे कठीण होते.

Q

स्थानिक नागरिकांची काय मागणी आहे?

A

स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाच्या निधीच्या उच्चस्तरीय चौकशीची आणि प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com