Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा,महाविद्यालयांना सुट्टी

Palghar Holiday For Schools: पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंगणवाडी ते महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय.
Schools, Anganwadis, and colleges shut in Palghar due to heavy rain red alert issued for tomorrow
Schools, Anganwadis, and colleges shut in Palghar due to heavy rain red alert issued for tomorrow
Published On

राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून दोन दिवसापासून राज्याभरत जोरदार पाऊस होत आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिलाय. उद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलीय.

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्याचे परिपत्रक जिल्ह्यातील सर्व शाळांना पाठवण्यात आले आहे.पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आालाय. जिल्ह्यातील अंगणवाडी , शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी सर्व शाळांना आदेशाचे परिपत्रक पाठवले आहे. जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यातील काही भागात आज पावसाची संततधार सुरू आहे.

Schools, Anganwadis, and colleges shut in Palghar due to heavy rain red alert issued for tomorrow
Gadchiroli : गडचिरोलीला रेड अलर्ट, पूरामुळे भामरागडचा संपर्क तुटला | VIDEO

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील चार दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय. मुंबईत पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालाय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालीय. नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे शेतीला जीवदान मिळालंय. नांदेड शहरालगत असलेले विष्णुपुरी धरण सध्या ८४ टक्के भरलंय.

Schools, Anganwadis, and colleges shut in Palghar due to heavy rain red alert issued for tomorrow
Powai Rain : पवईत मुसळधार पाऊस, चाळींमध्ये शिरलं पाणी | VIDEO

गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून येथील शाळांना सुट्टी देण्यात आलीय. पर्ल कोटा नदीला पूर आल्याने भामरागडचा गडचिरोलीशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलीय.

दरम्यान विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झालेत. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली होती. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत आदेश जारी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com