Palghar News : पालघरमधील रिसॉर्टमध्ये गर्लफ्रेंडवर गोळीबार; प्रकरणाला नवं वळण; 'ती' गोळी बॉयफ्रेंडनं नव्हे तर...

Palghar Resort Young Woman Firing : १७ वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खासगी रिसॉर्टवर गेली होती. यावेळी धोडी नामक प्रियकर वॉशरूममध्ये गेला असता या तरुणीनं या प्रियकराची बॅग तपासण्यास सुरुवात केली.
Palghar Kelve Boyfriend Firing girlfriend at resort
Palghar Kelve Boyfriend Firing girlfriend at resort Saam Tv News
Published On

पालघर : पालघरमध्ये तरुणीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. पालघरमधील केळवे येथे एका रिसॉर्टमध्ये हा थरार घडला. या गोळीबारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी जखमी झाली. जखमी मुलीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. रिवॉल्वर दाखवताना गर्लफ्रेंडला चुकून गोळी लागल्याचा दावा तरुणाने केला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मागील आठवड्यात देखील केळवे येथे एका तरुणीचा रिसॉर्टमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता या गोळीबाराच्या घटनेनं केळवे परिसरात खळबळ उडाली आहे.

त्याचदरम्यान, आता या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. या तरुणीवर गोळी तरुणाने झाडली नसून आपल्याच हातातून गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. १७ वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खासगी रिसॉर्टवर गेली होती. यावेळी धोडी नामक प्रियकर वॉशरूममध्ये गेला असता या तरुणीनं या प्रियकराची बॅग तपासण्यास सुरुवात केली. मात्र, याच बॅगमध्ये असलेला विनापरवाना गावठी कट्ट्याचं ट्रिगर या तरुणीकडून दाबलं गेल्यानं या कट्ट्यातून निघालेली गोळी थेट या तरुणीच्या मानेजवळ लागली. या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिला बोईसरच्या अधिकारी लाईफ लाईन्स या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Palghar Kelve Boyfriend Firing girlfriend at resort
Jalinder supekar Transfer : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली

दरम्यान, या तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात पालघर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात याच केळवे पर्यटन स्थळी एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे येथील रिसॉर्ट आणि हॉटेलचालक आपल्या रिसॉर्टमध्ये रूम्स देताना योग्य ती कागदपत्रांची पडताळणी करत नसल्यानेच असे प्रकार वाढत असल्याचं आता सांगितलं जातंय.

Palghar Kelve Boyfriend Firing girlfriend at resort
Shocking Murder Mystery : गीता हे तू काय केलं… घागरा चोलीत मृतदेह, जिला बायको समजला तो तर…; पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com