जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. या हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये दहशतवाद्यानी आपल्याशी संवाद साधला असल्याचा मोठा दावा जालन्यातल्या पर्यटकाने केला आहे. 'तू काश्मिरी दिसत नाहीस, हिंदू आहेस का?, असा प्रश्न संशयित दहशतवाद्याने या तरुणाला विचारला होता.
पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत या तरुणाशी संवाद साधला होता. 'तू काश्मिरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का?', असा प्रश्न त्या संशयिताने आदर्श राऊतला विचारला होता. दहशदवादी आदल्या दिवशी 'आज भीड कम है', असं एकमेकांशी बोलत होते असे देखील आदर्श राऊतने सांगितले. आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर, जालना येथील आदर्शने त्याच्याशी बोलणाऱ्या संशयिताची ओळख पटवली. संशयित दहशतवाद्याची ओळख पटवल्यानंतर आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेले संभाषण आणि मॅगी स्टॉल चालकाचा नंबर देखील पाठवला आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधी आपण पहलगाममध्ये असल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊतने केला आहे .
दरम्यान, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार गेला. या गोळीबारामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यातील पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. तर, पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी पाच ते सहा दिवस रेकी केल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पुण्यातील एका पर्यटकाने देखील एनआयएला शेअर केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.