Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद

Mumbai20% Hotels Closed: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका मुंबईला बसताना दिसत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आणखी परिणाम होऊ शकतात.
Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद
Mumbai Hotels ClosedSaam Tv
Published On

Summary -

  • इराण- इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जगाला फटका

  • जागतिक तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे

  • मुंबईमध्ये एलपीजी गॅस टंचाईमुळे सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद पडली आहेत

  • पुढील २-३ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास ५० टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता

इराण आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्ससह अनेक उद्योगांना गॅस टंचाईचा फटका बसताना दिसत आहे.

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद
Iran–Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे रायगडमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची धास्ती

मुंबईमधील हॉटेल उद्योगाला गॅस टंचाईचा सर्वात जास्त फटका बसला आहे. असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजे आहारच्या मते, गॅस पुरवठ्याअभावी मुंबई शहरातील २० टक्के हॉटेल्स सध्या बंद आहेत. हे असेच चालू राहिले तर पुढील २ ते ३ दिवसांत गॅस टंचाईमुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मालक संकटात आले आहेत.

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद
US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

मुंबईतील हॉटेल्स किती दिवस उघडे राहू शकतात हे प्रत्येक हॉटेलमध्ये किती गॅस शिल्लक आहे त्यावर अवलंबून आहे. हॉटेल्स बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय आहारने अद्याप घेतलेला नाही. तर हॉटेल्स उघडे ठेवायचे की नाही ते त्या त्या हॉटेलच्या मालकांनी ठरवावे, असे आहारकडून सांगण्यात आले आहे.

Mumbai Hotels: युद्धाच्या भडक्यामुळे मुंबई गॅसवर, मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद
Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com