Pahalgam terror attack : PM नरेंद्र मोदी संकटकाळी बेपत्ता; पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचा टोला; भाजपनेही दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Pahalgam terror attack News : पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसने भाजपला टोला लगावला. काँग्रेसच्या टीकेला भाजपनेही दिलं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Pahalgam News
Pahalgam terror attack Saam tv
Published On

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत टीका केली. काँग्रेसच्या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने 'एक्स'वर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपने 'एक्स'वर म्हटलं की, ' पाकिस्तान आणि त्यांचा साथीदार काँग्रेस पक्ष धमक्या देत आहे. त्यांनी धमक्या द्याव्यात. पण नवा भारत झुकणार नाही. आमच्यामध्ये आता फूट पडणार नाही. दहशतवाद्यांना बिर्याणीतून नाही, तर गोळीबाराने उत्तर दिलं जाईल. आता निर्णयक्षमता असणाऱ्या नेतृत्वाचं युग आहे'.

काँग्रेसच्या पोस्टवरून भाजपने एक पत्रकार परिषद घेतली. यात भाजप नेता गौरव भाटिया यांनी म्हटलं की, 'काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, सैन्याची ताकद, भारतीयांचे आशीवार्द सर्व एका ध्येयासाठी काम करत आहेत. काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे. आपल्यासोबत राहतो. मात्र, काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान म्हटलं चुकीचं ठरणार नाही'.

Pahalgam News
Nashik Crime : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार; टोळक्याकडून जामिनावर सुटलेल्या गुंडाची दगडाने ठेचून हत्या, परिसरात खळबळ

गौरव भाटिया यांनी पुढे म्हटलं की, 'देशाचे पंतप्रधान मोदी पहाडासारखे आहेत. काँग्रेस पहाडाला फोडण्याचं काम करत आहे. काँग्रेसचं राहुल गांधी यांच्याशिवाय पत्ता हालत नाही. राहुल गांधी यांच्या बोलण्यावर पोस्ट केल्या जातात. भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्ष पाकिस्तानला सिग्नल देतो. आमच्यावर वाईट नजर असणाऱ्या शक्तीचा आम्ही नायनाट करू'.

Pahalgam News
Pahalgam Attack : भारताचं ऑपरेशन पीओके? पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

'संपूर्ण जगात भारताचे मूळ रहिवासी आहेत. ते पाकिस्तानी दूतवासांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. पाकिस्तानची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. पाकिस्तानी दूतावास धमक्या देत आहेत. त्यांना साथ देण्याचं काम काँग्रेस करत आहे, असेही भाजपने म्हटलं आहे.

Pahalgam News
Pahalgam Terror Attack : भारताचा वॉटरस्ट्राईक, पाकड्यांचा थयथयाट; पाकची कोल्हेकुई, भुट्टोनेही ओकली गरळ, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com