भारताच्या सार्वभौमत्वावर,अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानंही डरकाळी फोडलीये. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना आणि त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलायं. या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंड पाणी पळालंय. मोदींनी काय म्हटलंय पाहूया...
एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय. दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरु केलायं... पहेलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि भारतात परतले त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली पाहूया....
मोदींची डरकाळी,पाकचा जळफळाट
सिंधू पाणी कराराला स्थगिती
अटारी सीमा बंद
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद
पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं
ये नया भारत है... पाकिस्तानची परिस्थिती आधीच नाजूक आहे. त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय. त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. सीमेवर आत्ताच हाऊज द जोश च्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्यात... दुसरीकडे भारत पुन्हा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय... त्यामुळे लवकरच पाकड्यांसह दहशतवादाचा बिमोड भारत करणार आणि नराधमांना मातीत गाडणार हे अटळ...आणि पुन्हा काश्मिरात नंदनवन खुलणार एवढं नक्की...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.