Sakshi Sunil Jadhav
तुमच्या आजुबाजुच्या परिसरात टिटव्या तुम्हाला पाहायला मिळत असतीलच. पण त्यांच्या आवाज अजुनही अनेकांना भीतीदायक वाटतो.
तुम्हाला रोज ना ना तऱ्हेची स्वप्न पडत असतील. आपल्या घरातले पुर्वज आपल्याला त्यांच्याबद्दलची काही संकेत सांगतात.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात टिटवी ओरडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ काय? आणि भितीदायक आहे का? याचं उत्तर जाणून घेऊयात.
काही स्वप्न ही गुढ प्रकारची असतात. त्यात जेव्हा स्वप्नात पक्षी दिसतात, तेव्हा नव्या संधी मिळणार, काहीतरी नव्या चांगल्या गोष्टी घडणार असं म्हणतात.
स्वप्न शास्त्रानुसार टिटवी स्वप्नात दिसणं म्हणेज अत्यंत शुभ आणि चांगल असतं. पण याची दुसरी बाजू सुद्धा आहे.
टिटवी जेव्हा स्वप्नात येऊन ओरडे म्हणजेच रडते ही संकेतं धोक्याची असू शकतात. याला अशुभ मानलं जातं.
टिटवी हा पक्षी माळराणावर किंवा जास्त गवताळ प्रदेशात आढळतो. विशेष म्हणजे एखाद्या झाडाखाली किंवा गवतामध्ये हा पक्षी आढळतो.
लाल आणि पिवळ्या चोचीच्या टिटव्या गवताखाली अंडी घालत असतात. साप, कोल्हा, मांजर, खोपड यांपासून त्यांचे संरक्षण टिटव्या करतात.