Jalna : बनावट शेतकरी दाखवून ५७ कोटीचे अनुदान लाटले; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Jalna News : नैसर्गिक आपत्ती ज्यात अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जात असते. अर्थात पंचनामे करून त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जात असते
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: पिकांची लागवड केलेली नसताना बोगस पीक विमा उतरविल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर आता बोगस शेतकरी दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यात आल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. यामध्ये तब्बल २५ हजार बनावट शेतकरी दाखवत ५७ कोटींचे अनुदान लाटल्याचे चौकशीत समोर आले. 

नैसर्गिक आपत्ती ज्यात अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जात असते. अर्थात पंचनामे करून त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जात असते. त्यानुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, ढगफुटी, अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र हे अनुदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

Jalna News
Water Crisis : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; महिलांचा वसमत पालिकेवर घागर मोर्चा

२५ हजार बोगस शेतकरी 

शेतकऱ्यांचे अनुदान लाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात ३१ मार्चपर्यंत १२ हजार शेतकरी बोगस आढळून आले होते. मात्र त्यात आता वाढ झाली असून १५ एप्रिलपर्यंत ही संख्या २५ हजारावर गेली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा आकडाही ५० कोटीवरून ५७ कोटी रुपयांवर गेल्याचे समोर आले आहे. 

Jalna News
Kolhapur : बाष्पीभवन रोखण्यासाठी धरण क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प?; पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी सकारात्मकता

संपूर्ण जिल्ह्यात होणार तपासणी 

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्य समितीने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील १५० गावातील खातेदारांची तपासणी करत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी या तालुक्यानंतर आता जिल्हाभरात अशीच प्रकारची तपासणी होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com