Kolhapur : बाष्पीभवन रोखण्यासाठी धरण क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प?; पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी सकारात्मकता

Kolhapur news : राज्यभरात उन्हाळा प्रचंड तीव्र झाला आहे. एप्रिल महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार झाला. तापमानात वाढ झाल्यामुळे धरण पाणीसाठ्यामध्ये देखील घट होताना पाहायला मिळते
Kolhapur news
Kolhapur newsSaam tv
Published On

रणजित माजगांवकर

कोल्हापूर : तीव्र उन्हामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम म्हणून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून धरणावरील बाष्पीभवन टाळण्यासाठी धरण क्षेत्रामध्ये सोलर पॅनल बसवण्याची संकल्पना पुढे आली आहे. तर या संदर्भात पायलेट प्रोजेक्ट देखील राबवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. 

राज्यभरात उन्हाळा प्रचंड तीव्र झाला आहे. एप्रिल महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार झाला. तापमानात वाढ झाल्यामुळे धरण पाणीसाठ्यामध्ये देखील घट होताना पाहायला मिळते. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनात वाढ झाल्याचा निष्कर्ष पुढे आला. काळम्मावाडी धरणातून मार्च महिन्यात २ हजार ६६१ दशलक्ष लिटर तर राधानगरी धरणातून सुमारे १४० दशलक्ष लिटरहून अधिक पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांसह जलस्रोतांमधील बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याच समोर आले आहे.  

Kolhapur news
Maharashtra Heat Wave : सूर्यदेव कोपला! चंद्रपुरात तीन दिवस येलो अलर्ट; राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद

पहिला पायलट प्रोजेक्ट होणार 

दरम्यान राज्यभरातील धरणसाठा हा उन्हाच्या तीव्रतेमुळे कमी होतो. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी संकट घोंगावत आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धरणातील पाणीसाठ्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी धरण क्षेत्र परिसरात सोलर पॅनल बसवण्याची संकल्पना पुढे आणली आहे. याबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील करणार आहेत. तर मंत्री मुश्रीफ यांच्या या संकल्पनेला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही सकारात्मकता दर्शवत हा पाहिला प्रोजेक्ट राबवण्याची गरज असल्याचे म्हटल आहे.

Kolhapur news
Water Crisis : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; महिलांचा वसमत पालिकेवर घागर मोर्चा

दुहेरी फायदा होणार 
दरम्यान धरण साठ्यातील पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी धरण परिसरामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यास याचा फायदा महावितरण ला नक्कीच होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकते. त्यामुळे हा धरण क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यास तो नक्कीच फायदेशीर असल्याचं महावितरण स्पष्ट केले. सध्या धरणाच्या पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचे नियोजन हे पारंपारिक पद्धतीने सुरू आहे. त्यातच आता धरण क्षेत्रामध्ये सोलर बसवून वीज निर्मिती केल्यामुळे दुहेरी फायदा शासनाचा होणार होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com