Water Crisis : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; महिलांचा वसमत पालिकेवर घागर मोर्चा

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच वसमत शहरातील नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आठ दिवसांची वेटिंग करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला
Water Crisis
Water CrisisSaam tv
Published On

हिंगोली : मराठवाड्यात सगळीकडे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना आता हिंगोलीमध्ये देखील पाणी प्रश्न पेटला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली असून पाणी मिळत नसल्याने हिंगोलीच्या वसमत शहरातील महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. याठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच वसमत शहरातील नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आठ दिवसांची वेटिंग करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. नागरिकांनी या विरोधात पालिका प्रशासनाला जाब विचारला असता पालिका प्रशासनाचे अधिकारी ठोस उत्तर देत नसल्याने आज वसमत शहरातील महिला प्रशासनाच्या विरोधात संतप्त झाल्या होत्या. जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत पालिकेच्या दारातून उठणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. 

Water Crisis
Hingoli Crime : हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली; हिंगोलीत दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरी

घोटभर पाण्यासाठी मुलांना उतरवताय विहिरीत 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व हिंगोली तालुक्यात अनेक गावातील महिला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर पेडगाव वाडी गावात महिला पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी थेट विहिरीमध्ये मुलांना उतरवत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांना पाणी टंचाईचे चटके बसत असताना प्रशासन मात्र या गावात पाणीटंचाई नसल्याचा दावा करत आहे.  

Water Crisis
Maharashtra Heat Wave : सूर्यदेव कोपला! चंद्रपुरात तीन दिवस येलो अलर्ट; राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद

पाणीपुरवठा सुरु असल्याची खोटी माहिती 

धक्कादायक म्हणजे प्रशासनाने केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अनेक गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती दिली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावे पाण्याविना कोरडेठाक पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाला खोटी माहिती देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी आणि आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे; अशी मागणी महिला ग्रामस्थ करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com