Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर, राजकीय वर्तुळात उडणार खळबळ

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे.

Yash Shirke

अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात सध्या नाराजीसत्र सुरु आल्याचे पाहायला मिळतंय. पक्षातील मोठे नेते आणि आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाषण करण्याच्या मुद्यावरुन केलेले विधान चर्चेत होते. भास्कर जाधव यांनी बोलताना संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली होती. नाराजीच्या चर्चा सुरु असताना भास्कर जाधव यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आलीये.

शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेल्या नेते आणि आमदार भास्कर जाधव यांना आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षप्रवेशाची ऑफर दिलीये. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भास्कर जाधवांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करावा असं मिटकरींनी म्हटलंय. भास्कर जाधव यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि राज्याला फायदा होणार असल्याचे आमदार मिटकरी म्हटले. आमदार मिटकरी यांच्या या ऑफरने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

मिटकरींनी पुढे बोलताना म्हटलं की.. जाधवांच्या व्यथा, अनेक दिवसांच्या संवेदना लपून राहलेल्या नाहीये.. त्यांच्या सारख्या खमक्या वाघाने परिवर्तन केलं पाहिजे.. त्यांनी राष्ट्रवादीत यावं, अशी विनंती मिटकरींनी केलीय.. तसेच जाधव यांना तिकडं अस्वस्थ वाटत असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दारं उघडे आहेत.. राष्ट्रवादी त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असेही मिटकरी म्हटले.. ते अकोल्यात बोलत होते.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गावरून काँग्रेस नेते सतेज पाटील हे गैरसमज पसरवित असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. सरकारनं शेतकरी हित समोर ठेवूनच या महामार्गासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे आमदार मिटकरी म्हणालेय.

दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावरही आमदार मिटकरी यांनी टीका केलीये. आमदार मिटकरी यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. लोकशाहीत जनतेपेक्षा कोणीही मोठं नसल्याचा टोला त्यांनी लोणीकरांना लगावलाय. लोणीकरांचा असं वक्तव्य खुद्ध मोदींनाही आवडणार नसल्याचं मिटकरी म्हणालेय.

माळेगाव साखर कारखान्याचा निकाल हा अजितदादांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा असल्याचा मिटकरी म्हणालेय. कारखान्याचे मतदान ईव्हीएमद्वारे झालं असतं तर विरोधकांनी निकालात हेराफेरी केल्याची ओरड केली असती असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT