
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी भाषा सक्तीला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. हिंदी भाषा सक्तीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर ५ मिनिटांत हा विषय संपेल. आम्हाला हिंदी भाषेचा द्वेष नाही पण हिंदी सक्तीला आमचा विरोध राहिल.', असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.
हिंदी भाषा सक्तीविरोधात आज मराठी भाषा समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून दीपक पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. दीपक पवार हे हिंदी भाषा सक्तीविरोधत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आझाद मैदानावर या आंदोलनाला ते सुरूवात करणार आहे. या आंदोलनात मराठी माणसांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कोणत्याही भाषेचा द्वेष नाही. पण कारण नसताना हिंदी सक्ती लादली गेली. महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही. महाराष्ट्रावर हुकुमशाही लादण्यासाठी यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेनेचा जन्म मराठी माणसांवर होणाऱ्या अन्ययाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. आम्ही दीपक पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ही आंदोलनाची सुरूवात असेल.पण दोन आंदोलन करून ते थांबणार नाही. जोपर्यंत सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार बाटंगे आणि काटंगे असे त्यांचे धोरण दिसत आहे.'
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'ते मराठी भाषिकांमध्ये मिठाचा किंवा विषाचा खडा टाकत आहे. संगळं चांगले चालले आहे त्यामध्ये ते विष टाकत आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. पण हिंदी सक्तीला आमचा विरोध राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर ५ मिनिटांत हा विषय संपेल. आम्हाला हिंदीच वावडे नाही पण हिंती सक्तीवरून हा तुमचा छुपा अजेंडा दिसत आहे. एकाधिकार शाहीकडे यांची वाटचाल सुरू आहे. ते भाषिक आणीबाणी लादत आहेत. पण भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाही.'
तसंच, हिंदी भाषेचा विरोध आम्ही करणार आहोत. शिवसेनेतले गद्दार मिंदेपणाने राहत आहेत. आम्ही कोणतीही सक्ती लादून घेणार नाही. हिंदी कुणाला येत नाही असे नाही. हिंदी सर्वांना येते. आमच्या मुलांवर हिंदीची सक्ती लादून देणार नाही. हिंदी सक्तीविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दीपक पवार यांच्यासोबत आम्ही आहोत. मी सर्व मराठी माणसांना आवाहन करत आहे. मराठी साहित्यिक, क्रिकेटर, मराठी कलाकार या सर्वांनी मराठीसाठी एकत्र यावे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती आम्ही मराठी माणसावर लादू देणार नाही.' , असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.