Thackeray: ठाकरे गटाचा गड राखणारा आमदार नाराज? व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स होतंय व्हायरल; 'दिव्याला तेलाची गरज...'

Bhaskar Jadhav WhatsApp post: शिवसेनेचे कोकणचे आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. लवकरच ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Uddhav thackeray Latest News
Uddhav thackeray NewsSaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरू आहे. विशेषतः शिवसैनिकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणचे आमदार भास्कर जाधव यांनी जरी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमधून नाराजीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते, दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही', अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. जाधव यांनी ठेवलेल्या सूचक स्टेट्सनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर नेमकी काय पोस्ट लिहिली होती?

अलिकडेच भास्कर जाधवांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवलं होतं. त्या स्टेट्सचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते. दिवा विझल्यानंतर त्या दिव्याला काही अर्थ नाही. माणसाचंही तसंच..वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करण्यात अर्थ काय?', अशा प्रकारचं स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी स्टेट्स ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

Uddhav thackeray Latest News
Pandharpur: हॉटेलमध्ये गॅस लिकेज अन् भयानक स्फोट; २ चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू, आई- वडील गंभीर

व्हॉट्सअॅप स्टेट्समधील आशयावरून भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात भास्कर जाधव मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भेट घेऊन भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Uddhav thackeray Latest News
BJP MLA Crime: भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

"स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते"

काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं, 'कधी कधी स्पष्ट वक्तेपणामुळे त्याची किंमत मोजावी लागते. कमी कामाची संधी मिळते कारण आपण 'हुजूर जी' करत नाही.' असं त्यांनी विधान केलं होतं. या विधानानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आताच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सनंतर त्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com