Raj Thackeray: हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; ६ जुलैसाठी केली मोठी घोषणा, मराठी बांधवांना आवाहन करत..

Raj Thackeray on Hindi Language: त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली आहे. ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
Raj Thackeray Angry On  Hindi Language
Raj Thackeraysaam Tv
Published On

राज्यात त्रिभाषा सूत्रामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, या निर्णयाचा विरोध जनतेसह अनेक नेत्यांनी केला. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही केला. यासंदर्भात आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, नेमकं काय घडलं? तसेच यावर मनसेची भूमिका काय? यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी त्यांनी ६ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. या मोर्चाला मराठी बांधवांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आज भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी त्यांनी दर्शवलेली भूमिका पूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला त्यांचा निर्णय मान्य नसल्याचं सांगितलं. खरंतर पाचवीनंतरच पर्यायी भाषा शिकवली जाते. त्यांनी हेही मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्येही या गोष्टीचा समावेश केलेला नाही, राज्यावर लादलेली ही गोष्ट आहे. मग ते असं का करत आहेत? यांना हिंदी सक्ती का करायची आहे? हे अनाकलनीय आहे', असं राज ठाकरे म्हणाले.

तसेच 'सीबीएसई शाळा या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या होत्या. त्या शाळांचं वर्चस्व करण्याचे प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात अशी सक्ती कशासाठी? हे का सुरू आहे? बाकी राज्य अशी भूमिका का घेत नाहीत? आमचा या संपूर्ण गोष्टीला विरोध आहे. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray Angry On  Hindi Language
Pandharpur: हॉटेलमध्ये गॅस लिकेज अन् भयानक स्फोट; २ चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू, आई- वडील गंभीर

६ जुलैला राज ठाकरे मोर्चा काढणार

पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. 'मी सर्व पक्षांना आवाहन करतो की, येत्या ६ जुलैला गिरगाववरून मोर्चा काढायचं ठरवलंय. या मोर्चामध्ये कोणताही झेंडा नसेल. हा मराठी माणसासाठी मोर्चा असेल. या मोर्चामध्ये मराठी माणसाने सहभाग घ्यावा, आम्ही या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता हा मोर्चा सुरू होईल. यासंदर्भात बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे', असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Angry On  Hindi Language
Nagpur: खेळता-खेळता उघड्या चेंबरमध्ये पडली, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; आई वडिलांचे रडून रडून हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com