
भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. 'तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट, चप्पल सरकारमुळेच', असं वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकार आणि त्यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांबाबत हे असं विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केले जात आहे.
बबनराव लोणीकर यांनी जालन्यामध्ये भाषण करताना हे धक्कादाय विधान केले आहे. ते म्हणाले की, 'कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे.'
तसंच, 'काही भिका#@*# तरुण कुचरवट्यावर बसतात आणि हे आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत असं लिहितात.. गावात विकासाची कामं केली, विविध योजनेतून पगारी सुरु केल्या, पेन्शन योजना आणली. मात्र कुचरवट्यावर बसणारे कार्टे लिहितात की, हे देवेंद्र फडणवीसांचे, नरेंद्र मोदीजींचे अंध: भक्त आहेत. पण तुझ्या गावात २५ वर्षात जे दिलं ते बबनराव लोणीकरांनीच दिलं. कुचरवट्यावर बरणाऱ्या कार्टाच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो, तुझ्या बापाला पेरणीला ६ हजार रुपये बबनराव लोणीकराने दिले, तुझ्या अंगावरले कपडे, बूट आणि चप्पल आमच्या सरकारची आहे.' असं लोणीकर यांनी म्हंटलं आहे.
याआधी देखील बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. दोन दिवसांपूर्वी जालना तालुक्यातील बोरगावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ८ कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात देखील त्यांची जीभ घरली होती. '५ वर्षाचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. तुम्ही मला नाही दिले तरी ५-१० कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका. मी एक दोन तीन वेळा पाहिल नंतर गावावर फुली मारील.', असं विधान त्यांनी केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.