Panchavati Police in Nashik arrest BJP leader’s aide Mama Rajwade in connection with molestation, extortion, and death threat case. Saam Tv
महाराष्ट्र

Nashik BJP Leader Case: ‘मामा राजवाडे’च्या टोळीचा माज खल्लास! भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Sunil Bagul’s Close Aide ‘Mama Rajwade’: नाशिकमध्ये भाजप नेते आणि सुनील बागूल यांचे समर्थक मामा राजवाडे याच्यावर महिलेचा विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी आणि खंडणीप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आता या घोषणेने नाशिक दुमदुमून गेले असताना भाजपच्या नेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत धिंड काढत त्यांचा माज जिरवत आहे.

ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेले सुनील बागूल यांचे कट्टर समर्थक मामा राजवाडेवर पोलिसांन खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. 50 हजारांचा हप्ता आणि दारू दिली नाही म्हणून राजवाडेच्या टोळीने पंचवटी भागातील एका रेस्टॉरंट बारमध्ये रात्रीच्यावेळी तोडफोड करत धिंगाणा घातला होता. यावेळी विरोध करणाऱ्या संचालक महिलेचा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी आणि कुख्यात गुंड मामा राजवाडेवर अजून एक गुन्हा दाखल करत त्याच्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मामा राजवाडे, बाबासाहेब बढे, योगेश पवार, प्रकाश गवळी, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, प्रवीण कुमावत भाजपचा धीरज शर्मा, राहुल बागमार-जैन, चैतन्य कावरे यांच्यासह चार अनोळखी साथीदारांविरुद्ध प्राणघातक हल्ला, तसेच महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला चढविणे, खंडणी उकळणे यांसारखे गंभीर गुन्हे पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कालमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नेमके काय?

रात्री उशिरा बारमध्ये येऊन मामा राजवाडे आणि त्याचे काही गुंड साथीदारांनी 50 हजारांचा हप्ता मागितला. त्यास नकार दिल्याने टोळीने बारची तोडफोड करण्याची धमकी दिली. तेथे पुन्हा त्याची अजून काही गुंड आले. त्यांनी फुकट दारू मागितली. त्यांना फिर्यादीने नकार दिला असता त्यांनी बारचे शटर बंद करण्याचा प्रयत्न करत पीडितेची वाट रोखून स्त्री मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा काही गुंडांना येऊन मामा राजवाडेंच्या माणसांना फुकट पार्सल आणि हप्त्याचे पैसे का देत नाही काय... तुमचे हात पाय तोडून तुमचा माज जिरवतो अशी धमकी दिली आणि लोखंडी गज, कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत दुखापत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच भारतीय खेळाडूचा राजीनामा, १७ वर्षाच्या करिअरचा शेवट

Maharashtra Live News Update : - नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमवेत अंबादास दानवेंनी साजरी केली दिवाळी

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

SCROLL FOR NEXT