Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास

Pune News : पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘वन पुणे कार्ड’ची सुरु होणार आहे. आता एकाच कार्डवर मेट्रो आणि पीएमपीएमएल प्रवास शक्य होणार आहे. या कार्डमुळे वेळ आणि पैशांची बचत होईल.
Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास
Pune Transport NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात सुरू होणार ‘वन पुणे कार्ड’ ही नवी सेवा

  • मेट्रो, पीएमपीएमएल आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी एकच कार्ड

  • प्रवाशांचा वेळ, पैसा आणि प्रवासातील त्रास कमी होणार

  • स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एकसंध सार्वजनिक वाहतूक प्रणालीची दिशा

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. कारण आता प्रवाशांना 'वन पुणे कार्डच्या' माध्यमातून मेट्रोचा प्रवास करू शकणार आहेत. या कार्डच्या आधारे पुणेकर ‘पुणे मेट्रो’, ‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो’ आणि ‘पीएमपीएमएल’ बस मधून प्रवास करू शकणार आहेत. शिवाय या कार्डमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसे बचत होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रवाशांना एकसंध आणि सुलभ सेवा देणे या हेतूने शासनाने 'वन पुणे कार्ड' ही नवीन सेवा पुणेकरांसाठी आमलात आणली आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवासी मेट्रो, पीएमपी बस आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या सर्व सेवांचा वापर एकाच कार्डवर करू शकतील. पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो टप्पा-1 आणि पीएमपी बस या दोन सेवांसाठो हे एकत्रित कार्ड लागू होणार आहे. भविष्यात देखील या कार्डचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास
Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

या उपक्रमामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळं तिकीट किंवा कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. सध्या मेट्रो, पीएमपी आणि पीएमआरडीए या तिन्ही संस्थांकडून काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, सार्वजनिक वाहतूक वापरणं अधिक सोयीस्कर होईल.

Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास
TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

या कार्डद्वारे प्रवासी मेट्रोचे तिकीट काढू शकतील, पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करू शकतील आणि भविष्यात पार्किंग,सार्वजनिक सायकल सेवा, सार्वजनिक शौचालये, अगदी किरकोळ खरेदीसाठीही कार्डचा वापर शक्य होईल. पुढील काही महिन्यांत ही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com