Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

Social Media Viral Resignation Letter : कंपनीच्या टार्गेट आणि पगाराच्या तफावतीला कंटाळून कर्मचाऱ्याने "मी काम करतो, जादू नाही!" असं म्हणत राजीनामा दिला. या राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल
Viral NewsSaam Tv
Published On
Summary

कंस्ट्रक्शन कंपनी सोडणाऱ्या एका तरुणाचं रिझाईन लेटर व्हायरल होत आहे

या रिझाईन लेटरमध्ये "या कंपनीत फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही" असं त्याने म्हटलं

कंपनीने सांगितलं की पत्र कदाचित विनोद म्हणून लिहिलं गेलं आहे

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे

सध्याची तरुणाई नोकरीकडे फक्त एक करिअर म्हणून पाहत नाही, तर ती कुटुंबाचं आणि स्वतःच भविष्य सुरक्षित करण्याचं एक साधन म्हणून पाहतात. पण आपण काम करत असलेल्या ऑफिसच्या वातावरणात नैराश्य आणि तणावाचं वातावरण असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशाच स्वरूपातील एका कर्मचाऱ्याची गोष्ट समोर आली आहे. ज्याने त्याच्या बॉस आणि एकंदरीत कंपनीच्या धोरणांना कंटाळून राजीनामा दिला जो आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

एका कंस्ट्रक्शन कंपनीने एका कर्मचाऱ्याचा रिझाईन लेटर शेअर केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. AC Minza असं या कर्मचाऱ्याच नाव आहे. त्याने या रिझाईनमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, "सर, मी राजीनामा देत आहे कारण या कंपनीत फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही. मी काम करतो, जादू नाही." या लेटरवर कंपनीचा अधिकृत स्टँप मारण्यात आला होता.

या कंस्ट्रक्शन कंपनीने रिझाईन लेटरला उत्तर देत म्हटले आहे की, "आम्हाला आज हे रिझाईन लेटर मिळालं. आम्हाला शंका आहे की ते विनोद म्हणून लिहिले गेलं आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केले गेलं आहे. कारण ते ऑफिस डायरीतील एका पानावर लिहिलेलं दिसतं, राजीनामा सहसा साध्या कागदावर लिहिला जातो किंवा ईमेलद्वारे पाठवले जातो." त्यांनी स्पष्ट केलं की ते त्याची सत्यता पडताळू शकत नाहीत.

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल
Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

ही पोस्ट काही तासांतच जोरदार व्हायरल झाली आणि त्याला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांनी ती सेव्ह केली. तर काहींनी तरुणाचीच बाजू घेतली. "हा माणूस अगदी बरोबर आहे. जर पगार वाढत नसेल तर टार्गेट का वाढवायचे?" असं म्हटलं. तर "जर इन्क्रीमेंट होत नसेल तर टार्गेट वाढवणं निरर्थक आहे" असं देखील लोक म्हणत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com