शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics: केडीएमसी निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या गटाची ताकद वाढलीय. भाजपचे माजी सदस्य लक्ष्मण आंबोकर आणि माजी काँग्रेस नगरसेवक उदय रसाळ हे शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत.
Maharashtra Politic
Eknath Shinde and Shrikant Shinde welcome hundreds of BJP and Congress workers into Shiv Sena during a grand event in Kalyan.saam tv
Published On
Summary
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाचा मोठा राजकीय डाव.

  • भाजपचे लक्ष्मण आंबोकर आणि काँग्रेसचे उदय रसाळ शिवसेनेत दाखल झालेत.

  • शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे केडीएमसीमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे.

आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपल्या पक्षात प्रवेश करुन आपली ताकद वाढवत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेससह आपला मित्र भाजपला आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी आज शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केलाय.

हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये पार पडला. यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक समाजसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या गडात नव्याने झालेल्या या प्रवेशामुळे पक्ष संघटनाला स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळणार आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मण आंबोकर यांचा जनसंपर्क मोठा आहे. तर उदय रसाळ हे कल्याण परिसरातील लोकप्रिय माजी नगरसेवक असून, त्यांचे काँग्रेसमध्ये चांगले नेटवर्क आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे.

Maharashtra Politic
Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे केडीएमसी निवडणुकीपूर्वी महायुती आणि विरोधी पक्षांतील समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील ही राजकीय हालचाल आता स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

Maharashtra Politic
Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

भाजपचे वरिष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे नाराज

भाजपचे वरिष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्याच पक्षावर टीकेचे बाण सोडले आहेत. यामुळे कल्याण-डोबिंवलीतील गटबाजी आणि भाजपचा अंतर्गंत वाद चव्हाट्यावर आलाय. काही महिन्यांपूर्वी विकास निधी न मिळाल्याने म्हात्रे दाम्पत्याने पक्षाचा राजीनामा दिला होता. दरम्यान निधीसाठी त्यांना भाजपकडून आश्वासन देण्यात आले होते. पण चार महिने उलटूनही निधी न आल्याने त्यांची नाराजी वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com