
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितलं जात आहे.
पक्षातील बेशिस्तपणावरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना धक्का बसलाय. हा धक्का सोलापूरच्या माजी आमदाराच्या रुपाने भेटणार आहे. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच अजित पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याचदरम्यान आज त्यांनी माध्यामांशी संवाद साधलाय.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्याच पक्षावर कडक शब्दात टीका केली आहे. पक्षातील कारभारावरून त्यांनी प्रथमच सर्वांसमोरच नाराजी व्यक्त केली. राजन पाटील हे पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खूप नाराज असल्याचं दिसत आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीत बेशिस्तपणा वाढलाय, खोचक टोलाही माजी आमदार यांनी पक्षाला लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माजी आमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांनंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. माध्यमांसमोर येताच राजन पाटील यांनी आपल्याच पक्षातील कारभारावर बोट ठेवला. राष्ट्रवादीत बेशिस्तपणा वाढत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आगामी काळात स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी एकमेकांचे नेते पळवत आहेत. आता भाजपने अजित पवार यांना धक्का देत सोलापूरचे माजी आमदार राजन पाटील यांना आपल्या गळाला लावले आहे. राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती त्यानंतर आज राजन यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. जाहीरपणे नाराजी बोलून दाखवताना राजन पाटील यांनी पक्षावर टीका केली.
अजित पवार गटातील कारभार विस्कटलेला आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर टीका करताना राजन पाटील म्हणाले, मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही. त्यांना जर कोणी मोठा नेता मानत असेल तर ते दुर्दैव आहे. पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे. त्यानंतर आपण भाजपमध्येच का जातोय याचे कारण सांगताना त्यांनी म्हटलं की, त्या पक्षात उमेश पाटील नाहीये, त्यामुळे आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलातना सांगितलं. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत त्यामुळे ते आमच्या निर्णयाशी सहमत आहेत. ते देखील आमच्यासोबत येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.