Mahayuti : ...तर आम्ही आम्ही स्वतंत्र लढू, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं युतीबाबत मोठं विधान

CM Fadnavis Statement On Corporation Election: स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप युतीसाठी प्रयत्न करेल, पण जिथे ते शक्य नाही तिथे स्वतंत्रपणे लढेल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
CM Fadnavis Statement On Corporation Election
CM Devendra Fadnavis addresses media in Pune — says BJP may contest independently if alliance isn’t possible in Swarajya Sanstha elections.saam tv
Published On
Summary
  • स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं विधान.

  • मित्रपक्षांवर टीका न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश.

  • पुण्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधान केलं.

आगामी काळात राज्यात स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत अनेक तर्क वितर्क काढली जात आहेत. त्याचदरम्यान मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत मोठं विधान केलंय. शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी शक्य होणार नाही, तिथं आम्ही स्वतंत्र लढू, असं विधान देवेंद्र फडणवीस केलंय. ते पुण्यात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत की सगळे अधिकार आमच्या जिल्हास्तरावर दिले आहेत. जिथे शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी शक्य होणार नाही, तिथं आम्ही स्वतंत्र लढू, स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.

CM Fadnavis Statement On Corporation Election
Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा

या दौऱ्यात त्या विभागातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा आढावा घेत आहोत. आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यात घेतला. येथून गेल्यावर कोकण विभागाचा आढावा मुंबईत घेणार आहोत. यात मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती, आता काय आहे याचा आढावा घेतोय.

युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे, आढावा घेतोय. त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. पक्षाची संघटना म्हणून बूथ रचना किंवा आणख निवडणूक संघटन असेल या सगळ्या गोष्टींसंदर्भात चर्चा करून पुढचे दिशानिर्देश देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

CM Fadnavis Statement On Corporation Election
Maharashtra Politics: भंडाऱ्यात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

या आढावा बैठकीत सगळे मंत्री, आमदार, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक वेगवेगळे लोक एकत्र होते. वेगवेगळ्या जिल्ह्याच आढावा घेतला. सकारात्मक परिस्थिती दिसते, उत्साह आहे. युतीच्या संदर्भातदेखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत की सगळे अधिकार आमच्या जिल्हास्तरावर दिले आहेत. जिथे शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे.

काही ठिकाणी शक्य होणार नाही, तिथं आम्ही स्वतंत्र लढू, स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे निर्देश दिलेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे युनिट्स चर्चा करतात. युती ठरवतात. काही ठिकाणी ती होते देखील. त्यामुळे निर्णय हा खालच्या स्तरावर योग्य होईल, असा मला विश्वास आहे.

भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉग कार्यकर्ता आला तर त्याला घेण्याची आमची भूमिका आहे. जे आमचे कार्यकर्ते आहेत, ते स्वीकारतात. म्हणून भाजप मोठा झालेला आहे. काही ठिकाणी नाराजी निर्माण होते, पण आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते समजून घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com