Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा

Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हंबरडया मोर्चावर सडकून टीका केली. 'निवडणुका जवळ आल्याने उद्धव ठाकरे हंबरडा फोडताय, मात्र त्यांना कुणी चारा टाकणार नाही.', असा टोला त्यांनी लगावला.
Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा
Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackerayx
Published On

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

लक्ष्मण हाकेंना काय टीका करायची करू द्या. अशी वक्तव्य करणारे नेतृत्व पाहिजे का? याचा विचार समजा बांधवांनी केला पाहिजे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना काही लोक मुक्ताफळे उधळत असतील तर आपण काय उत्तर देणार? मात्र अशा टीका झाल्यावर वेदना होतात, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेनंतर दिली. त्याचसोबत यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. 'निवडणुका जवळ आल्याने उद्धव ठाकरे हंबरडा फोडताय, मात्र त्यांना कुणी चारा टाकणार नाही.', असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

विखे पाटील यांनी सांगितले की, 'मला लक्ष्मण हाकेंना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांना काय टीका करायची करू द्या. कोणतंही आंदोलन करताना मागण्यांची भूमिका मांडली पाहिजे. आमची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही सरकारची आधीपासूनची भूमिका आहे. मात्र काही नेत्यांकडून बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅझेटमधील कुणबी नोंदी १९६७ सालापासून आहेत. कोणीही अर्ज केला तर दाखला मिळत नाही कारण शासनाने कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये. काही याचिका न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाबाहेर काही लोक मुक्ताफळे उधळत असतील तर आपण काय उत्तर देणार? अशा पद्धतीच्या टीका झाल्यावर वेदना होतातच. आमचे देखील अनेकांशी तात्त्विक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाही. तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे उत्तर नाही.'

Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा
Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

उध्दव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चाचा देखील विखे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. 'उद्धव ठाकरेंकडे हंबरडा फोडण्याशिवाय काही राहिलेले नाही. शासनाने ३२ हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे. अनेक नियम बदलून मर्यादा वाढवून मदत दिली जात आहे. निवडणुका जवळ आल्याने ते हंबरडा फोडत आहेत. मात्र त्यांना कोणी घास घालणार नाही. सरकारला त्याचं काम करू द्याव हे माझं त्यांना आवाहन आहे.' असे राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले.

Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा
Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

अहिल्यानगर येथे ओवेसींच्या उपस्थितीत झालेल्या एमआयएमच्या सभेहवरही विखे पाटलांनी टीका केली. 'आपल्या जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आलंय. त्यामुळे कोणी जातीय सलोखा बिघडणार असेल तर कारवाई करू. नाव का बदलले? हे विचारण्याचा त्यांना अधिकार नाही. औरंगजेबाच्या अवलादींना असं वाटत असेल पण आम्हाला ते मान्य आहे.' तसंच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगाताप यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. संग्राम दुसऱ्यांदा निवडून आले असून त्यांना त्यांची जबाबदारी समजते. त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचे ठरवले त्याच स्वागतच आहे. मात्र त्यांच्या मनात काय माहीत असल्याचे विखे पाटलांनी म्हटलंय.

Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा
Politics: आमदाराविरोधात ईडीची मोठी कारवाई, ४० किलो सोन्यासह १०३ कोटींची मालमत्ता जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com