Nashik Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! एसटी बसने बापलेकाला चिरडलं, मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू झाला.

Priya More
  • नाशिकच्या येवला-नांदगाव रोडवर भीषण अपघात

  • भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली

  • अपघातामध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले

  • वडिलांनी मुलाच्या डोळ्यासमोर प्राण सोडले

अजय सोनवणे, मनमाड

नाशिकमध्ये एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून प्रवास करणारे बापलेक रस्त्यावर पडले. एसटीच्या चाकाखाली चिरडून वडिलांचा जागीच मृ्त्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत. मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांनी प्राण सोडले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला-नांदगाव रोडवर ही अपघाताची घटना घडली. सोमठाणा जोश गावाजवळील हनुमान पाटी परिसरात भरधाव एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. मुलाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास येवला तालुका पोलिस करत आहे.

अहिल्यानगरमध्ये बसला भीषण अपघात -

अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर भीषण अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस जेऊर परिसरात उलटली. लक्झरी बस रस्त्याच्या कडेला उलटल्यामुळे अनेक जण जखमी झाले. या बसमधून २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. खरवंडीवरून लग्न समारंभ उरकून लक्झरी बस पुण्याच्या दिशेने चालली होती. जेऊर परिसरातील डिव्हायडरवर अचानक बस आढळून रस्त्याच्या कडेला उलटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT