Accident News : भीषण अपघात! खोल दरीत पिकअप कोसळून 6 प्रवाशांचा मृत्यू

Himachal Pradesh Shimala Accident News : हिमाचल प्रदेशात भीषण अपघात घडला. पिकअप वाहन खोल दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू.
HIMACHAL PRADESH ACCIDENT: SIX KILLED AFTER PICKUP VEHICLE PLUNGES INTO GORGE IN RAMPUR
HIMACHAL PRADESH ACCIDENT: SIX KILLED AFTER PICKUP VEHICLE PLUNGES INTO GORGE IN RAMPURSaam Tv
Published On
Summary
  • प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन खोल दरीत कोसळले.

  • भीषण अपघातात वाहनातील सहा जणांचा जागीच मृत्यू

  • बचाव पथकांनी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूरमध्ये भीषण अपघात घडला. तकलेच चौकी हद्दीतील उरमान परिसरात एक पिकअप वाहन खोल दरीत कोसळल्याने त्यामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची पाहणी केली. दरम्यान पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन रामपूर येथून तकलेच गावाकडे जात होते. तकलेच हे गाव रामपूरपासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात आहे. प्रवासादरम्यान उरमान परिसरात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला आणि त्यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

HIMACHAL PRADESH ACCIDENT: SIX KILLED AFTER PICKUP VEHICLE PLUNGES INTO GORGE IN RAMPUR
Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. दरीत उतरून बचावकार्य राबवण्यात आले. मात्र, सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघातात अभिषेक सनी (२३), लायक राम (५६), चालक अशोक जैन (३२), नितीन (२३), आशा कुमारी आणि त्यांचा मुलगा युगल यांचा मृत्यू झाला.

HIMACHAL PRADESH ACCIDENT: SIX KILLED AFTER PICKUP VEHICLE PLUNGES INTO GORGE IN RAMPUR
Rain Alert : मुंबईसह २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे; वाचा IMD चा अंदाज

मृतांपैकी आशा कुमारी आणि युगल हे कुल्लू जिल्ह्यातील अनी परिसरातील रहिवासी होते, तर इतर सर्व जण रामपूर परिसरातील विविध गावांतील होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती आणि तांत्रिक बिघाड याची चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com