red chillies, nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Mirchi Market: मिरचीचा 'ठसका' वाढला! नंदुरबार बाजार समितीमध्ये विक्रमी आवक; दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

Mirchi Market News: गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आवक बाजार समितीत झाले आहे. आवक वाढली असली तरी मिरचीचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार, ता|१२ डिसेंबर २०२३

Nandurbar News:

अवकाळीच्या संकटानंतर नंदुरबार मधील मिरची बाजार सुरू झाला असून मिरचीचे विक्रमी आवक होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आवक बाजार समितीत झाले आहे. आवक वाढली असली तरी मिरचीचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार (Nandurbar) कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची खरेदीचा एक लाख क्विंटलचा टप्पा पार झाला असून अवकाळी पावसाच्या संकटानंतर पंधरा दिवसांनी बाजारपेठ सुरू झाली आहे.

पहिल्या दिवशी बाजारपेठेत मोठी आवक होती. त्याच प्रमाणे दुसऱ्या दिवशीही ही आवक विक्रमी असल्याचे दिसून आले. बाजारामध्ये ६०० तो ७०० वाहनांतून जवळपास दहा ते पंधरा हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल झाली आहे. या मिरचीला प्रतवारीनुसार दर मिळत असून ओल्या लाल मिरचीचे दर ४ हजारांपासून ते ६००० रुपयांपर्यंत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच कोरड्या लाल मिरचीला ७००० पासून ते १६ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. दरम्यान, एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच पुन्हा मिरची बाजारपेठ पुन्हा सुरू झाला असून आवक वाढूनही मिरचीचे दर कायम असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT