Indapur Railway Station: रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास; इंदापूर स्थानकातील भीषण वास्तव उघडकीस

Indapur Railway Station News: या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट घराकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी त्यांना उभ्या असलेल्या मालगाडी खालून कसरत करत जावं लागतंय.
Indapur Railway Station
Indapur Railway StationSaam TV
Published On

सचिन कदम

Indapur:

कोकण रेल्वे मार्गावरील इंदापूर रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चुकीच्या दिशेला तिकीट घर असल्याने या रेल्वे स्थानकात जीव धोक्यात घालून तिकीटासाठी प्रवास करण्याची वेळ येथील प्रवाशांवर आली आहे. या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indapur Railway Station
Indapur Crime News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर काझडला गाेळीबार, दाेघांवर गुन्हा दाखल

माणगाव आणि कोलाड रेल्वे स्थानकामधील इंदापूर (Indapur) रेल्वे स्थानकात प्रवाशांची अधिक वर्दळ नसल्याने या ठिकाणी नेहमी मालगाड्या उभ्या केल्या जातात. स्थानकाचे प्रवेशद्वार आणि प्लॅटफॉर्म यांच्या विरुध्द बाजुला तिकीट घर आहे. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट घराकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी त्यांना उभ्या असलेल्या मालगाडी खालून कसरत करत जावं लागतंय.

तिकीट न काढता प्रवास करणं म्हणजे नियमांचं उल्लंघन करणे. नियम न मोडता प्रवास करायचा म्हटलं तर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. जीव धोक्यात घालून तिकीट काढण्यासाठी ये जा करावी लगत आहे. प्रवाशांसोबत येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील मालगाडी खालून येजा करावी लागत आहे. रेल्वे (Train) प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.

मालगाडी रुळांवर उभी असताना व्यक्ती जेव्हा येथून ट्रेन खालून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी अचानक मालगाडी सुरू झाली तर? अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो अशी परिस्थिती असताना तिकीट घर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच बांधून द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Indapur Railway Station
Akola Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कार आणि बाईकची जोरदार धडक; भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com