Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस; स्टेजला दिलं किल्ल्याचं रूप

Manoj Jarange Patil News: सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून बोरी सावरगाव येथील ही सभा विक्रमी आणि विराट असणार असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवानी दिलीये.
Published on

विनोद जिरे

Manoj Jarange Patil:

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत. तर पहिली सभा ही बोरी सावरगाव येथे होणार असून सभेची जय्यत तयारी मराठा बांधवांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या स्टेजवरून मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत, त्या स्टेजला किल्ल्याचं रूप दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून बोरी सावरगाव येथील ही सभा विक्रमी आणि विराट असणार असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिलीये. बोरी सावरगाव येथील सभेनंतर किल्ले धारूर आणि शेवटची सभा ही माजलगाव तालुक्यातील हारके निमगाव या गावांमध्ये होणार आहे.

दरम्यान, काल रात्री अंबाजोगाईच्या आंबा साखर कारखाना परिसरात झालेल्या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळात त्यांना येथून सुट्टी मिळणार असून ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून आणि चौथ्या टप्प्यातील आजच्या शेवटच्या दिवशीच्या सभेतून मनोज जरांगे पाटील काय बोलणार ? याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर...

धाराशिवच्या सभेनंतर जरांगे बीडला सभेला पोहोचले. बीडमधील सभेतही त्यांनी खुर्चीवर बसूनच भाषण केलं. या सभेवेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, 'छगन भुजबळ यांचं ऐकूण सरकार आपल्यावर अन्याय करेल असं मला वाटत आहे. राज्य सरकारने आंदोलकांवील दाखल गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर सोपं नाही. मला माझ्या गोरगरीब समाजासाठी आरक्षण पाहिजे', असं जरांगे पाटील यांनी कालच्या सभेत म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com