Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded : शिंदेसेनेच्या युवा नेत्याची भरचौकात चौघांनी केली हत्या, २०२१ मध्येही झाला होता हल्ला

Nanded Crime News : नांदेडमधील सोनू कल्याणकर हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीला पोलिस कारवाईत जखमी करण्यात आले आहे. जुन्या वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची हत्या

  • चार आरोपी काही तासांत अटकेत

  • एका आरोपीला पोलिस कारवाईत गोळी लागली

  • जुन्या वादातून खून झाल्याचा संशय

सागर सूर्यवंशी, नांदेड

नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज सकाळी सोनु कल्याणकर या ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोनु कल्याणकर हा नांदेडमधील भाजपा युवा मोर्चा माजी महानगराध्यक्ष होता, तर सध्या तो एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता म्हणून काम करायचा. त्याची हत्या करणाऱ्या चार मारेकऱ्यांना काही तासात पोलीसांनी अटक केली. प्रसाद शिंदे , कृष्णा जोगदंड , रवी लोट या तिघांना अटक करण्यात आली. तर एकाला पकडताना त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजता नांदेड शहरातील श्रीनगर भागात तीन ते चार मारेकऱ्यांनी सोनू कल्याणकरला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या काही तासात मृत तरुणाच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. प्रसाद शिंदे , कृष्णा जोगदंड , रवी लोट अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर एक आरोपी आकाश गंदमवार हा नांदेड शहराजवळच्या झरी गावाच्या शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार एलसीबीचे पथक तिथे पोहचले.

पोलीसांना पाहून आकाश गंदमवार शेतात पळाला.पोलीसांनी पाठलाग सुरु केला.तेव्हा आरोपी आकाश गंदमवार याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.पण फायर झालं नाही.त्याने पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न करत असतांना पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आकाश गंदमवार याच्यावर गोळी झाडली. त्याच्या पायाला गोळी लागली.जखमी अवस्थेत आकाश गंदमवार याला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान आरोपी आणि सोनु कल्याणकर यांच्यात नवरात्रीच्या काळात वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील वाद झाला होता.त्याच रागातून सोनु कल्याणकर याचा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगीतले. शिवाय या खूनाचे आणखी काही कारण आहे का?आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरु आहे.

२०२१ साली रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने सोनु कल्याणकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात सोनु कल्याणकर बचावला होता.सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात आहे. मात्र या खून प्रकरणात गोलू मंगनाळे याचा काही सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. मयत सोनू कल्याणकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनु कल्याणकर याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी आकाश गंदमवार हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत

मित्र झाला वैरी! डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं; २४ तासात दोन खुनाच्या घटनांनी सांगली हादरलं

Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

Custard Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट कस्टर्ड, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT