Six NCP (Sharad Pawar faction) councillors from Hingna go missing ahead of Nagpur MLC elections, triggering political speculation. saam tv
महाराष्ट्र

शरद पवार गटाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; मविआच्या गोटात मोठी खळबळ

Six NCP Sharad Pawar Faction Councillors Not Reachable In Nagpur: नागपूरमध्ये हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 6 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 6 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. हे सर्व नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची आणि भाजपचा हात धरल्याची जोरदार कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी एकत्र निवडणूक लढत असून काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हे मविआचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून राजीव पोतदार यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली आहे.

नागपूर जजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे एकूण 19 नगरसेवकांचे संख्याबळ मतदार आहे. मविआच्या विजयासाठी ही मते अत्यंत निर्णायक मानली जात आहेत. मात्र या 19 पैकी हिंगण्याचे 6 नगरसेवक अचानक गायब आणि नॉट रिचेबल झाल्याने महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ६ नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा जर खरी ठरली, तर याचा थेट फटका महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांना बसू शकतो, तर भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : खुशखबर! सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना महावितरणाची केराची टोपली? स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम!

Water retention: अचानक वाढतंय वजन आणि फुगतंय पोट? शरीरात पाणी साठण्याच्या धोकादायक लक्षणांकडे वेळीच द्या लक्ष

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून दर्शन नियमात मोठा बदल, VIP दर्शन पूर्णपणे बंद, काय आहे कारण?

दिशा पटानीसारखी स्लिम-फिट फिगर हवीये? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' 1 स्पेशल डिटॉक्स ड्रिंक!

SCROLL FOR NEXT