

१७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर.
मतदान १८ जून रोजी होणार असून अडीच वर्षांनंतर या जागांसाठी निवडणूक होत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची यादी अंतिम केलं.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान गेल्या अडीच वर्षांपासून या निवडणुका लागल्या नव्हत्या. अडीच वर्षांपासून या आमदारकीच्या जागा रिक्त आहे. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जातात. यंदा सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया, नाशिक आणि अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
या निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. दुपारी ३ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या निवडणुकीसाठी अनेकजण उत्सुक होते. महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गतच बंडाळी झाली. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनीही राष्ट्रवादीच्या तिकिटावर अर्ज भरला.
१७ जगांसाठी उमेदवारांची नाव निश्चित झालीत. भाजप ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) ४, राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ८ जागांवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष ५ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजप उमेदवारांची यादी
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावे
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे
सांगली-सातारा – अनिश्चित
पुणे- श्रीकांत पाटील
ठाणे- अभिजीत पवार
अपक्ष
छत्रपती संभाजीनगर-जालना- समीर सत्ता
नाशिक – अनिल कदम
परभणी- हिंगोली – डॉ. विवेक नावंदर
छत्रपती संभाजीनगर – जालना – देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर
जळगाव – शरद तायडे
रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग – सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली – शैलेश देशमुख
अमरावती – हर्षदीप देशमुख
यवतमाळ – साहेबराव कांबळे
लातूर – महेश देशमुख
सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर
नागपूर – अतुल लोंढे
भंडारा-गोंदिया – दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.