पुण्यातील दारू हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपीच्या घरावर महापालिका चालवणार 'बुलडोझर'

Pune Fugewadi Liquor Case Demolition Action: पुण्यातील फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई होणार असून मुख्य आरोपीच्या घरावर पिंपरी चिंचवड महापालिका बुलडोझर चालवणार आहे.
Municipal authorities prepare for demolition of illegal structure linked to Pune’s deadly spurious liquor case.
Municipal authorities prepare for demolition of illegal structure linked to Pune’s deadly spurious liquor case.saam tv
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड: फुगेवाडी येथील धक्कादायक विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विरका कुटुंबियाला महापालिका चांगलाच दणका देणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुढील 24 तासांत विरका कुटुंबियांच्या घरावर बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणार आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

40 वर्षांपासून सुरू होता अवैध दारू अड्डा

मिळालेल्या माहितीनुसार, फुगेवाडी परिसरातील संजय नगर येथे विरका कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून आपल्या राहत्या घरातच अवैध हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते. याच अड्ड्यावरील विषारी दारुमुळे 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या घटनेनंतर प्रशासनाने विरका कुटुंबियांच्या बेकायदेशीर कृत्यांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Municipal authorities prepare for demolition of illegal structure linked to Pune’s deadly spurious liquor case.
Solapur Crime: सोलापूर हादरले! बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ बनवला, नंतर तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि निर्मूलन विभागाने विरका कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेने त्यांच्या महापालिकेने त्यांच्या घरावर कायदेशीर नोटिस बजावली आहे. या नोटिसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पुढील 24 तासांत बांधकाम अनधिकृत असल्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा स्वतः हून हे बांधकाम न हटवल्यास त्यानंतरच्या 24 तासांत महापालिका स्वतःहून हे बांधकाम जमीनदोस्त केले जाईल. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईचा आणि पाडकामाचा खर्च देखील विरका कुटुंबियांकडूनच वसूल केला जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.

Municipal authorities prepare for demolition of illegal structure linked to Pune’s deadly spurious liquor case.
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

कारवाईच्या भीतीने सामान हलवण्यास सुरुवात

महापालिकेची 'बुलडोझर' कारवाई होणार हे निश्चित होताच विरका कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली आहे. नोटीस लागल्यापासूनच त्यांनी कारवाईच्या भीतीने आपल्या घरातील मौल्यवान आणि महत्त्वाचे सामान इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आता काय मोठी कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com