The MSRTC bus that went to the wrong village and later broke down, causing a major delay in the wedding schedule. Saam Tv
महाराष्ट्र

लग्नाला ३ तास उशीर, नवरदेवांची थेट एसटीकडे तक्रार, मिळणार ५५ हजारांची नुकसान भरपाई, नेमकं काय घडलं?

MSRTC Wedding Bus Wrong Address: नांदगाव आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे लग्नासाठी बुक केलेली एसटी बस चुकीच्या गावात पोहोचली आणि रस्त्यात बंद पडली. या त्रासाबद्दल ग्राहक मंचाने बिडवे कुटुंबाला ५५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

Omkar Sonawane

एस.टी.परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगारातील ढिसाळ कारभारामुळे जिल्हा ग्राहक मंचाने तगडा दणका दिला असून, तक्रारदाराला एकूण ५५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. लग्नासाठी एसटी महामंडळाची बस बुक केली होती. मात्र बसला चुकीचा पत्ता देण्यात आल्याने ती वेगळ्याच गावात पोहोचली. त्यातच बस रस्त्यात बंद पडल्याने वर्‍हाड उशिरा पोहोचले आणि लग्नालाही तासन्‌तास उशीर झाला. यामुळे संतापलेल्या बिडवे कुटुंबियांनी यांनी थेट ग्राहक मंचाचा आधार घेत तक्रार दाखल केली अन् प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या.

नांदगाव येथील सलून व्यवसायिक सतीश बिडवे यांच्या मुलाचे लग्न २३ फेब्रुवारी २०२३ रोजी बाबरा (ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) येथे होते. यासाठी त्यांनी नांदगाव आगारातील बस १५ फेब्रुवारी रोजी २२,००० रुपये भरून बुक केली होती. मात्र आगार व्यवस्थापकाने चालकाला चुकीचा मार्ग सांगितल्याने बस नस्तनपूर येथे गेली आणि नंतर उशिरा बिडवे यांच्या घरी पोहोचली.बस निघाल्यानंतर जेमतेम ५० किलोमीटर अंतरावरच ती रस्त्यात बंद पडली.

बिडवे यांनी तात्काळ आगार अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता “अर्ध्या तासात दुसरी बस देतो” सांगण्यात आले. परंतु नवी बस तब्बल तीन तासांनी देण्यात आली. परिणामी, साडेबारा वाजताचा मुहूर्त असलेले लग्न जवळपास तीन ते साडेतीन तास उशिरा पार पडले. यामुळे वर-वधूपक्षाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.यावर बिडवे यांनी या त्रासाबाबत नांदगाव आगाराविरुद्ध ग्राहक मंचात दाद मागितली होती. सुनावणी दरम्यान त्यांनी पाच लाख रुपयांची भरपाई मागितली.

दोन्ही बाजूंचे मत ऐकून घेतल्यानंतर न्याय मंचाच्या अध्यक्षा मंदाकिनी भोसले आणि सदस्या कविता चव्हाण यांनी बिडवे यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी ५०,००० रुपये, तर अर्जाच्या खर्चासाठी ५,००० रुपये अशी एकूण ५५,००० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंडळाला दिले. या प्रकरणात बिडवे यांच्यावतीने गौरव पवार व तानाजी वाजे यांनी मांडणी केली.

नांदगाव आगाराची सद्यस्थिती

नांदगाव आगार उत्पन्नात जिल्ह्यात अग्रस्थानी असला तरी येथे जुनाट व कालबाह्य झालेल्या बसांची संख्या मोठी आहे. या बस वारंवार रस्त्यात निकामी होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप, उशीर आणि अनेकदा अपघातासारखे प्रसंगही सहन करावे लागतात. प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ होऊ नये म्हणून बसेसची योग्य देखभाल करून नवीन बसांची तातडीने मागणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: 84 दिवसांचा वॅलिडीटीचा Jio चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

Bhosari Land Scam : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या, एकनाथ खडसेंना कोर्टाचा झटका

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

SCROLL FOR NEXT