Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर

Ahmedpur Nanded Highway Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील क्रेटा कारने ट्रकला दिलेल्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कार ट्रकखाली घुसल्याने चक्काचूर झाली असून सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर
Ahmedpur Nanded Highway AccidentSaam Tv
Published On
Summary

अहमदपूर बायपासवर क्रेटा-ट्रकचा भीषण अपघात

दोन तरुणांचा जागीच मृत्यू

अंदाजे १२०-१४० किमी वेगामुळे अपघात भीषण

पोलिसांनी मदतकार्य व वाहतूक सुरळीत केली

अहमदपूर - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अहमदपूर बायपासजवळ शनिवारी पहाटे २ ते २:३० च्या दरम्यान एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई क्रेटा कारने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा कार अक्षरशः ट्रकच्या मागील भागात घुसली. या दुर्घटनेत कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारमधील चालक रविकुमार तुकाराम दराडे व त्याचा मित्र सागर दिलीप ससाने हे दोन्ही तरुण शिरूर ताजबंद येथून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, त्याच रस्त्यावरून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि ती ट्रकच्या खाली पूर्णपणे गेली. अपघातामुळे ट्रकचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, मागील चार टायर तुटले असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर
Ravindra Chavan : महायुतीत फोडाफोडीला ब्रेक? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजप प्रवेश तूर्तास स्थगित

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गाडीचा वेग १२० ते १४० किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवली. कार ट्रकखाली दबल्याने क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले व त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर
Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com