Political News : "शत्रू भाऊ असला तरी..." कल्याणमध्ये बॅनर वादानंतर भाजप शिवसेनेमधील पॅनल वाद चव्हाट्यावर

Kalyan Dombivli Political News : कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक २च्या बालेकिल्ल्यासाठी भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आले असून अरविंद मोरे आणि वरुण पाटील यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीत तणाव वाढला आहे. स्थानिक पातळीवर संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे.
Political News : "शत्रू भाऊ असला तरी..." कल्याणमध्ये बॅनर वादानंतर भाजप शिवसेनेमधील पॅनल वाद चव्हाट्यावर
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये भाजप–शिंदे गटाचा संघर्ष चिघळला

  • वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले

  • महायुतीतील अंतर्गत कलह उघडपणे दिसू लागला

  • पॅनल क्रमांक २च्या बालेकिल्ल्यासाठी दोन्ही गटांची धडपड

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण–डोंबिवलीतील राजकारण पुन्हा तापलं आहे. डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. महायुती अस्तित्वात असली, युतीतर्फे एकत्र निवडणुका लढवण्याचे आवाहन असले तरी स्थानिक पातळीवर पॅनलवाद आणि बालेकिल्ला वाचवण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी तर थेट शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही असा इशारा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक वरुण पाटील यांनीही जशास तसे उत्तर देऊ आमच्या मार्गात कोणी आडवे येणार नाही असा पलटवार केला आहे.

महायुतीच्या घरातला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.याच पॅनलवरून आता भाजप आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.

Political News : "शत्रू भाऊ असला तरी..." कल्याणमध्ये बॅनर वादानंतर भाजप शिवसेनेमधील पॅनल वाद चव्हाट्यावर
Shocking : जालना हादरलं! पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाची सटकली; महिलेचा गळा आवळला अन्...

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपवर टीका करत म्हटले आहे की, "विधानसभा निवडणुकीत 80 पैकी 60 जागा शिंदे साहेबांच्या चेहऱ्यामुळे आम्ही जिंकल्या. तेव्हाच्या त्यांच्या नेतृत्वामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झाले.युती झाली तरी पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचाच आहे. एकही सीट भाजपला देणार नाही. विरोधक आमचे असोत वा परके जमिनीवर आम्हीच उभे राहणार गीतेने शिकवलंय शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय मिळत नाही. आमच्या समोर युतीचा उमेदवार असो वा दुसरा, आम्ही गारद करूनच सोडणार."

Political News : "शत्रू भाऊ असला तरी..." कल्याणमध्ये बॅनर वादानंतर भाजप शिवसेनेमधील पॅनल वाद चव्हाट्यावर
Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर

यावर प्रत्युत्तर देत भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील म्हणाले की, झोपवण्याची भाषा कराल तर जशास तसे उत्तर देण्यास आम्हीही तयार आहोत.निवडणुकीत कोण कोणाला झोपवेल हे जनता ठरवेल.मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणी मिठाचा खाडा टाकण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर मिळेल.आमच्या शत्रूचा मार्ग अडवणाऱ्यालाही आम्ही आडवे करू भाजप सक्षम आहे. भाजपने संयम ठेवला असला तरी 'उत्तर देण्यास तयार' अशी खुली चेतावणी दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com