msrtc bus service begins from usmanpur to partur after independence Saam Digital
महाराष्ट्र

Jalna : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावातून सुरु झाली लालपरीची फेरी, विद्यार्थी आनंदले

Siddharth Latkar

- अक्षय शिंदे

जालन्यातील परतूर तालुक्यातील उस्मानपुर गावातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची बस धावली. यामुळे गावाक-यांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. गावातून बस सुरु झाल्याने परतूर ते उस्मानपूर येथे जाणा-या शाळेसाठी जाणा-या विद्यार्थ्यांची पायपीट थांबल्याचा आनंद विद्यार्थ्यांचा बसमधून प्रवास करताना दिसत हाेता.

ही बस मानवविकास याेजने अंतर्गत सुरु झाली आहे. परतूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उस्मानपूर गावात सहावी पर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलींना परतूर शहरात यावं लागतं होत. गावातून शहरात येण्यासाठी बस नसल्याने मुलींचे शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढले होते.

दरम्यान ग्रामस्थांनी पुढाकार घेत बस सेवा करण्यासाठी प्रयत्न केले. गावात पहिल्यांदाच बस आल्याने ग्रामस्थांनी बसचे जंगी स्वागत केले. यावेळी बस चालकाचा आणि कंडक्टर यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.

उस्मानपूर गावातून बस सुरू झाल्यामुळे आता गावातील मुलींची शाळेसाठीची पायपीट थांबणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाच प्रमाण देखील वाढू शकतं असं गावकऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Pimpri Chinchwad Crime : पैशांसाठी चोरल्या दुचाकी, रिक्षा; १३ दुचाकींसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात

IND-W vs PAK-W: पाकिस्तानचा डाव फसला, श्रेयंका पाटील-अरुंधतीपुढे लोटांगण, भारतापुढे माफक आव्हान

Manoj Jarange : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, नारायण गडावर दसरा मेळावा, व्यासपीठ उभारणीचे नारळ फोडून पूजन

VIDEO : 1500 रुपयांच्या नावाने महिलांना धमकावलं जातं; वडेट्टीवारांचा घणाघात

SCROLL FOR NEXT