Nanded Zilla Parsihad School: शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

nanded kautha tanda villagers lock school demanding adequate teachers: अनेक वेळा मागणी करूनही शाळेला जादा शिक्षक मिळत नसल्याने काैठा तांडा गावकरी आज आक्रमक झाले.
nanded kautha tanda villagers lock school demanding adequate teachers
nanded kautha tanda villagers lock school demanding adequate teachers Saam Digital
Published On

- संजय सूर्यवंशी

राज्यभरातील शाळा 3 दिवसांपूर्वी सुरु झाल्या. या शाळांमध्ये वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा सुरु हाेऊन तीन दिवस उलटत नाहीत ताेच शिक्षकांच्या मर्यादित संख्येमुळे नाराज झालेल्या पालकांनी नांदेड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेस टाळे ठाेकले.

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. यामुळे पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

nanded kautha tanda villagers lock school demanding adequate teachers
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी मार्गावर भीषण अपघात; खासगी बसची ट्रकला मागून धडक, वाहनाचा चक्काचूर

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांडा येथील गावकऱ्यांनी शिक्षकांची मागणी करत चक्क शाळेलाच कुलूप ठोकले. पालक म्हणाले कौठा येथील शाळा पाचवी पर्यंत आहे. येथे विद्यार्थ्यांची संख्या उत्तम आहे. या शाळेत 80 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. तरी शिक्षकांची संख्या वाढवावी अशी आमची मागणी आहे.

Edited By : Siddharth Latkar

nanded kautha tanda villagers lock school demanding adequate teachers
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com