Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी मार्गावर भीषण अपघात; खासगी बसची ट्रकला मागून धडक, वाहनाचा चक्काचूर

Samruddhi Mahamarg Accident in buldhana : समृद्धी मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात खासगी बसची ट्रक चालक गंभीर झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Samruddhi Mahamarg Accident
समृद्धी मार्गावर भीषण अपघात; खासगी बसची ट्रकला मागून धडक, वाहनाचा चक्काचूरSaam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

बुलडाणा : समृद्धी मार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. समृद्धी मार्गावर आज मंगळवारी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. या महामार्गावर खासगी बसने भरधाव ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

आज मंगळवारी सकाळी समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला पाठीमागून खासगी प्रवासी बसने धडक दिली. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर बस चालक जखमी झाला आहे. या भीषण अपघातात बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सुदैवाने प्रवाशांना कुठलीही इजा झालेली नाही.

Samruddhi Mahamarg Accident
Kanchanjunga Express Accident : रेल्वे अपघात कधी थांबणार? गेल्या ६२ वर्षात हजारो दुर्घटना अन् प्रवाशांचा मृत्यू, वाचा सविस्तर

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मार्गावरील वाहतूक कोंडी कमी केली. पोलिसांनी मार्गावरील गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला. या अपघातात जखमी बस चालकाला बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर या रुग्णालयात उपचारात सुरु आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर ट्रकचा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी पळून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. या अपघातामधील गंभीर जखमी बस चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर बीबी रुग्णालायत उपचार सुरु आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या प्रकरणी किनगाव राजा स्थानिक पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Samruddhi Mahamarg Accident
Nandurbar Accident : भीषण अपघात.. भरधाव ट्रकने दोन दुचाकींना उडविले; दोघा तरुणांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको

पुण्यातील सिंहगडला रस्त्याला पुन्हा अपघात

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पुन्हा अपघात झाला आहे. सिमेंट मिक्सरखाली सापडून महिलेचा अपघात झाला आहे. अपघातानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील महिलेची प्रकृती स्थिर आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील विश्रांती नगर येथे प्रकाश इनामदार चौकात हा अपघात घडला आहे. गेल्या काही दिवसात सिमेंट मिक्सरखाली सापडून अपघात होण्याची ही या भागातील दुसरी घटना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com