Nandurbar Accident : भीषण अपघात.. भरधाव ट्रकने दोन दुचाकींना उडविले; दोघा तरुणांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावर दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना उडवत मोटारसायकलवरील दोघांना चिरडले. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Nandurbar Accident
Chopda Accident : ट्रकची दुचाकीला धडक; वृद्धेचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून गेलेल्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्वर हा अपघात घडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी याच भागात एका भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली होती. त्यात एका जणांचा मृत्यू झाला होता. तर सहा जण गंभीर झाले होते. यानंतर एका ट्रक चालकाने दुचाकीवर जाणाऱ्या दोघा तरुणांना चिरडले आहे. या अपघातात (Accident) दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने अवजड वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

Nandurbar Accident
Gas Cylinder Blast : कसबा पेठमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

नातेवाईकांचा रास्ता रोको 

अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी धाव घेतली. दरम्यान घटनास्थळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी रास्ता रोको केला. नातेवाईकांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रक चालकाला जोपर्यंत पोलीस अटक नाही, तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका घेतली होती. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com